मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
⛽ पेट्रोल मुंबई: ₹104.21/L | पुणे: ₹103.85/L
🪙 सोने (24K) ₹72,450 / 10gm
🥈 चांदी ₹84,200 / 1kg
📅 पंचांग आजची तिथी: श्रावण शु. पक्ष
ब्रेकिंग

टेलिग्रामच्या जाळ्यात जोगेश्वरीचा तरुण! शरीरसंबंधाचे आमिष, ब्लॅकमेलिंग आणि लूट – मेघवाडी पोलिसांची तडफदार कारवाई

अक्षर आकार:

 


संदिप कसालकर (संपादक, भारत २४ तास)

मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यांमध्ये एका तरुणाने सोशल मीडियाच्या आभासी दुनियेत विश्वास ठेवला आणि त्याच्या आयुष्याचा सर्वात मोठा धक्का बसला! एक टेलिग्रामवरील "गे ॲप" मेसेज, गुप्त भेट, अचानक उघडलेला दरवाजा… आणि त्यानंतर सुरू झालेली पैशांच्या बदल्यात ब्लॅकमेलिंगची धक्कादायक खेळी! पण मेघवाडी पोलिसांनी तडफदार कारवाई करत आरोपींना जेरबंद केलं आणि गुन्ह्याचा थरार उघडकीस आणला!

मुंबईच्या जोगेश्वरी परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. फिजिकल रिलेशनच्या आमिषाने एक तरुणाला बोलावून, त्याचे व्हिडीओ शूट करुन जबरदस्तीने पैसे उकळण्याचा प्रकार समोर आला असून, मेघवाडी पोलिस ठाण्याने तातडीने कारवाई करत चार आरोपींना अटक केली आहे. दोन आरोपी अद्याप फरार आहेत.

काय घडलं होतं?
दिनांक १८ मे २०२५ रोजी दुपारी सुमारास एका पीडित तरुणाला टेलिग्रामवरील "गे ॲप" वरून मेसेज आला. समोरून फिजिकल रिलेशनसाठी सेवा दिली जाते, असे सांगण्यात आले. पीडित तरुणानेही होकार दिला आणि पुढच्या दिवशी मोगरा मेट्रो स्टेशनजवळ भेटण्याचा प्रस्ताव मान्य केला.

१९ मे रोजी सायंकाळी ४ वाजता पीडित तरुण ठरलेल्या ठिकाणी पोहोचला. तेथे स्कूटीवर आलेला एक इसम त्याला शंकरवाडी, जोगेश्वरी येथील एका घरात घेऊन गेला. पहिल्या मजल्यावर असलेल्या घरात, पीडित तरुण आणि अज्ञात इसमामध्ये शरीर संबंध सुरू झाले. दरम्यान, अचानक दरवाजा उघडून तीन इसम घरात घुसले आणि त्यातील एकाने मोबाईलमधून दोघांचा अश्लील व्हिडीओ शूट करायला सुरुवात केली.

‘तेरे को छोडेंगे नहीं!’ – धमकी आणि मारहाण
व्हिडीओ शूट झाल्यानंतर पीडित तरुणाला धमकावून त्याच्याकडील दोन एटीएम कार्ड्स आणि पासवर्ड मिळवले गेले. त्यानंतर तरुणाला घरात डांबून ठेवण्यात आले. संध्याकाळी ५.३० च्या सुमारास चौघे आरोपी परत आले आणि त्याला 'जर कोणाला सांगितलंस, तर जिवंत ठेवणार नाही' अशी धमकी दिली. त्याच रात्री तरुणाच्या Axis आणि SBI बँक खात्यांतून अनुक्रमे २५,००० आणि १६,००० रुपये काढले गेले.

मेघवाडी पोलिसांची तातडीची चौकशी आणि जोरदार कारवाई
घाबरलेल्या तरुणाने मेघवाडी पोलिस ठाण्यात तात्काळ धाव घेतली. पोलीस उपायुक्त परिमंडळ 10 सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त मेघवाडी विभाग संपत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी जाधव, पोलीस निरीक्षक पवरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्याम पवरे, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर घाडगे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने कारवाई केली.

तपास पथकात अशा अधिकारीांचा समावेश आहे - ASI गोविंद पवार, पोलीस शिपाई गुरुनाथ राठोड, अनिकेत निकम, अविनाश कापसे, देवेंद्र ठाकूर, तसेच तांत्रिक मदत म्हणून पोलीस हवालदार पिसाळ. दाखल अधिकारी म्हणून महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी घोळवे कार्यरत आहेत.

टेलिग्रामवरील "गे ॲप"च्या लोकेशनच्या आधारावर कारवाई करत पहिल्यांदा आरोपी फैसल अब्दुल सत्तार खोकर यास पकडण्यात आले. चौकशीत त्याने टेलिग्राम आयडी त्याच्या मित्र याहीया तज्जामुल हुसैन शेख याला दिल्याचे कबूल केले.

यानंतर पथकाने याहीया शेख आणि त्याचा साथीदार मुस्तफा अबार खान यांना पास्कल कॉलनी, जोगेश्वरी पूर्व येथून पकडले. याहीया आणि मुस्तफाने उर्वरित दोन साथीदारांची नावे सांगितली – रियाज मुनाफ शहा आणि शाहीद वाजिद सय्यद. त्यांचा सध्या शोध सुरू आहे.

आरोपींकडून मोबाईल आणि रोख रक्कम हस्तगत
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून १७,५०० रुपयांची रोख रक्कम आणि मोबाईल जप्त केले आहेत. आरोपींवर भारतीय दंडसंहिता कलम ३०९(६), १२७(२), ११५, ३५१(३), ३५२ तसेच आयटी कायद्याअंतर्गत कलम ६६(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Bharat 24 Taas

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)