मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
⛽ पेट्रोल मुंबई: ₹104.21/L | पुणे: ₹103.85/L
🪙 सोने (24K) ₹72,450 / 10gm
🥈 चांदी ₹84,200 / 1kg
📅 पंचांग आजची तिथी: श्रावण शु. पक्ष
ब्रेकिंग

जोगेश्वरीतील प्रभाग ७४ मध्ये नागरी सुविधा विकासाला नवसंजीवनी; मनिषा वायकर यांच्या शुभहस्ते उद्घाटन व भूमिपूजन

अक्षर आकार:

संदिप रुक्मिणी विठ्ठल कसालकर (संपादक, भारत २४ तास) 

मुंबई – जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ७४ मध्ये खासदार निधीतून विविध नागरी सुविधा विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन मनिषा रविंद्र वायकर यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले. या विकासकामांमुळे स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन गरजांसाठी मोठा बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

उद्घाटनकार्यक्रमांतर्गत खालील कामांचे उद्घाटन करण्यात आले:

  • नित्यानंद सेवा मंडळ, मजास टेकडी – लादीकरण व गटारे

  • गोरखनाथ चाळ, रामवाडी – रस्ता काँक्रिटीकरण

  • शिवसाई मित्र मंडळ, सारीपुत नगर – लादीकरण व गटारे

  • न्यू इलेव्हन स्टार मंडळ, शिवटेकडी – शौचालय व लादीकरण

  • बाबुलनाथ पांडे चाळ, दत्त टेकडी – ६ आसनी शौचालय

  • स्मिता सदन चाळ, शिवटेकडी – लादीकरण व गटारे

  • वक्रतुंड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, प्रतापनगर – शेड बांधणे

पुढील कामांचे भूमिपूजन देखील करण्यात आले:

  • जय जवान क्रीडा मंडळ, शिवटेकडी – व्यायामशाळा साहित्य बसविणे

  • शांतीधाम सेवा मंडळ, शिवटेकडी – ६ आसनी शौचालय व मलनिस्सारण वाहिनी

  • न्यू इलेव्हन स्टार मंडळ, शिवटेकडी – ६ आसनी शौचालय

या कार्यक्रमास विभागप्रमुख ज्ञानेश्वर सावंत, अ‍ॅड. दीप्ती पोतनीस, अ‍ॅड. प्राजक्ता महाले, विशाल परब, धीरज परब, संजय महाडिक, संतोष भोसले, अमोल पारधी, विनायक यादव, संदीप डावल, दिगंबर मांजरेकर, अमृत क्षीरसागर, जितेंद्र पटेल, दिनेश हळदणकर, कांचन राणे, नागेश डांगे, मुन्ना नथवाणी, सायली मिर्लेकर, भाई मिर्लेकर आणि शिवसेनेच्या अंगीकृत संघटना, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, सोसायटी व कमिटी पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने स्थानिक शिवसैनिक उपस्थित होते.

स्थानिक नागरी सुविधा आणि जीवनमान सुधारण्यासाठी या विकासकामांना मोठी मदत होणार असून, आगामी काळात प्रभागाचा सर्वांगीण विकास होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Bharat 24 Taas

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)