Hot Posts

6/recent/ticker-posts

जोगेश्वरीत थरार! गोळीबार, बंधक, अतिरेकी... आणि पोलिसांची सर्जिकल ड्रिल!


संदिप रुक्मिणी विठ्ठल कसालकर (संपादक, भारत २४ तास)

मुंबई | 12 मे 2025

जोगेश्वरी पूर्व येथील मजास डेपो सोमवारी दुपारी एका थरारक परिस्थितीचा साक्षीदार ठरला. अचानकच दोन अतिरेकी अंदाधुंद गोळीबार करत प्रवाशांना ओलीस धरतात... आणि काही क्षणांत पोलीस, QRT कमांडोज, दहशतवादविरोधी पथक घटनास्थळी धडक मारतात!

हो, ही कुठलीतरी रियल हल्ल्याची बातमी नाही, तर मेघवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राबवण्यात आलेली दहशतवादी हल्ल्याची मॉक ड्रिल होती – पण इतकी रिअल की परिसरातील अनेकांना क्षणभर हे खरंच घडतंय असं वाटलं!


काय घडलं नेमकं?

12 मे रोजी दुपारी 2:47 वा., बीट मार्शल पो.ना. गरद (क्र. 00434) यांनी पश्चिम नियंत्रण कक्षास माहिती दिली की मजास डेपोवर 2 अतिरेकी घुसले असून गोळीबार सुरू आहे, प्रवासी ओलीस धरले आहेत.

तत्काळ प्रतिक्रिया देत, मेघवाडी पोलीस, दहशतवादविरोधी पथक, मोबाईल युनिट्स, बीट मार्शल, आणि QRT कमांडोज घटनास्थळी रवाना झाले.


कोण-कोण होते सहभागी?

  • West QRT – पोउनि. काकडे व 07 अंमलदार

  • Main QRT – स.पो.नि. मदवाण व 05 अंमलदार

  • दहशतवादविरोधी पथक – पोउनि. भोसले व पथक

  • मेघवाडी पोलीस निरीक्षक मंडळी – संभाजी जाधव, स.पो.नि. गुर्जर, भगत, तिडके

  • सहाय्यक पोलीस आयुक्त संपतराव पाटील

  • जीवन विकास केंद्राची ॲम्बुलन्स व डॉक्टर पथक

  • बीट मार्शल, मोबाईल पथके, कॉम्बॅक्ट टीम्स


ऑपरेशनचा अखेरचा टप्पा

15:33 वा. QRT टीम्सने ऑपरेशन सुरु केले आणि थरारक कारवाईदरम्यान 2 अतिरेकींना ठार मारले.
त्यांच्याकडून:

  • 2 SLR रायफल्स

  • 60 जिवंत काडतुसे हस्तगत

  • बंधक बनवलेले 2 प्रवासी सुरक्षित सोडवले

संपूर्ण ऑपरेशन फक्त 55 मिनिटांत – 16:28 वा. यशस्वीरीत्या पूर्ण झाले.


यशस्वी ड्रिलमागचं उद्दिष्ट

ही मॉक ड्रिल म्हणजे मुंबई पोलीस दलाची सजगता, चपळता आणि अचूक नियोजन याचं उत्तम उदाहरण. अशा सरावांमुळे प्रत्यक्ष घटनेवेळी कार्यक्षम प्रतिसाद देण्याची क्षमता अधिक बळकट होते.


जोगेश्वरीकरांनी काही क्षण भीतीचा अनुभव घेतला, पण पोलिसांच्या या रिअल लाइफ अ‍ॅक्शनसारख्या सरावाने त्यांचं मन जिंकलं!

पोलिसांचा संदेश स्पष्ट आहे – "संकट कुठलंच असो, आम्ही सज्ज आहोत!"

Post a Comment

0 Comments