भारत २४ तास • संपूर्ण माहिती. संपूर्ण सत्य.
मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
भारत २४ तास सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुपवर ताज्या बातम्यांसाठी जॉईन व्हा!

स्व.अब्दुल अजीम साहेब यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चिश्तीया कॉलेजमध्ये शिक्षक दिन उत्साहात

अक्षर आकार:
महाराष्ट्र व देशातील ताज्या घडामोडींसाठी ग्रुप जॉईन करा!
मोबाईल शेप डिजिटल बातमी कार्ड (4:5 Format) व्हॉट्सॲप स्टेटस व सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी १-क्लिकमध्ये डाऊनलोड करा!
जॉईन व्हा

विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती; भाषणे, कविता व विविध सादरीकरणांतून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त

खुलताबाद,9 स्पटेंबर 2026 -  उर्दू शिक्षण संस्था संचलित चिश्तीया कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, खुल्दाबाद येथील प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने दिवंगत अब्दुल अजीम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिक्षक दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या शिक्षक दिनाचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमात बी.एस्सी., बी.कॉम. तसेच बी.ए. शाखेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या शैक्षणिक योगदानाचे स्मरण करण्यासोबतच अब्दुल अजीम यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याला अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्राचार्य डॉ. आसिफ झकेरिया, डॉ. सय्यदा अर्शिया कादरी, प्रा. अमिना तब्बसुम, डॉ. अशोक भालेराव आणि प्रा. समरीन यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी विद्यार्थिनी सय्यद शिफा हिने अब्दुल अजीम यांच्या जीवनकार्यावर, त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील प्रयत्नांवर तसेच समाजासाठी केलेल्या योगदानावर भावपूर्ण व माहितीपूर्ण भाषण केले. त्यांच्या कार्याचा विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा, तसेच शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असा संदेश या भाषणातून देण्यात आला. यासोबतच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाचे महत्त्वही स्पष्ट करण्यात आले.


कार्यक्रमात सय्यद शिफा, एस.के. रुकसिन, गुलाम मुस्तफा, सय्यद कौसर, नौशीन फातिमा, तैबा कौसर, समीक्षा वाडेकर, नोहिद अस्लम, फैजा शर्मिन, सानिया मिस्बाह आणि आयशा खान यांच्यासह विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी भाषणे, कविता, अध्यापनाचे प्रात्यक्षिक तसेच विविध कलात्मक सादरीकरणे करून शिक्षक दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण आणि उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

यावेळी प्राचार्य डॉ. आसिफ झकेरिया आणि प्रा. अमिना तब्बसुम यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने आणि अर्थपूर्ण पद्धतीने आपले विचार मांडल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीचेही त्यांनी कौतुक केले.


डॉ. सय्यदा अर्शिया कादरी यांनी अब्दुल अजीम यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला. शिक्षण क्षेत्रासाठी त्यांनी केलेले समर्पित कार्य आणि समाजाच्या जडणघडणीत त्यांचे योगदान याविषयी त्यांनी उपस्थितांना माहिती दिली.प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाचे विशेष कौतुक करण्यात आले. डॉ. खान हमीदा, डॉ. शिल्पा देशपांडे आणि डॉ. अफरोजा खातून यांनी कार्यक्रमातील विविध सादरीकरणांचे परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.के. रुकसिन यांनी प्रभावीपणे केले, तर सय्यद शिफा यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी प्रा. फिरदोस, प्रा. शफी, डॉ. नाजलीन सुलताना आणि प्रा. फैजान सर यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्राणीशास्त्र विभागाच्या समन्वयक प्रा. अमिना तब्बसुम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शन, नियोजन आणि परिश्रमांमुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. शिक्षक दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षकांप्रती आदर, कृतज्ञता आणि शैक्षणिक मूल्यांची जाणीव करून देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम संस्मरणीय ठरला.



BHARAT 24 TAAS

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)
व्हॉट्सॲप शेअर