भारत २४ तास • संपूर्ण माहिती. संपूर्ण सत्य.
मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
भारत २४ तास सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुपवर ताज्या बातम्यांसाठी जॉईन व्हा!

ठाण्यात चोरट्यांचा सुळसुळाट! नौपाडा हद्दीत एकाच रात्री ४ दुकाने फोडली; ५० हजारांची रोकड लंपास

अक्षर आकार:
महाराष्ट्र व देशातील ताज्या घडामोडींसाठी ग्रुप जॉईन करा!
जॉईन व्हा
मोबाईल शेप डिजिटल बातमी कार्ड (4:5 Format) व्हॉट्सॲप स्टेटस व सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी १-क्लिकमध्ये डाऊनलोड करा!
विशेष रिपोर्ट: संदिप कसालकर
ठाणे : ठाणे पश्चिम परिसरातील नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी एकाच रात्री धुमाकूळ घालत तब्बल चार दुकाने फोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घरफोडीच्या सत्रामुळे स्थानिक व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ठाण्यातील पाचपाखाडी परिसरात असलेल्या प्रसिद्ध 'शतरंज वेफर्स' (Satranj Wafers) या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. दुकानाच्या गल्ल्यातील सुमारे ५० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास करून चोरटे पसार झाले.
केवळ एकाच दुकानावर न थांबता, नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक सलून आणि इतर दोन व्यावसायिक दुकानांनाही चोरट्यांनी लक्ष्य केले. एकाच रात्री लागोपाठ चार ठिकाणी झालेल्या या घरफोडीमुळे पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

पोलीस तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच नौपाडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजच्या आधारे संशयित चोरट्यांचा माग काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Kasalkar Insights

Sandeep Kasalkar's career is characterized by a relentless pursuit of journalistic excellence and a deep commitment to diverse storytelling. Whether through ground reporting, editorial leadership, or advocacy, he continues to make significant contributions to the media landscape. His multifaceted expertise and leadership are instrumental in shaping and advancing the field of journalism in India.

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)
व्हॉट्सॲप शेअर