भारत २४ तास • संपूर्ण माहिती. संपूर्ण सत्य.
मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
भारत २४ तास सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुपवर ताज्या बातम्यांसाठी जॉईन व्हा!

वेरूळच्या संत जनार्दन स्वामी विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात; माजी विद्यार्थ्यांसह विद्यार्थ्यांचा देशभक्तीचा जल्लोष

अक्षर आकार:
महाराष्ट्र व देशातील ताज्या घडामोडींसाठी ग्रुप जॉईन करा!
जॉईन व्हा
मोबाईल शेप डिजिटल बातमी कार्ड (4:5 Format) व्हॉट्सॲप स्टेटस व सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी १-क्लिकमध्ये डाऊनलोड करा!


खुलताबाद, 15 ऑगस्ट 2026 -  खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील श्री संत जनार्दन स्वामी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (गुरुकुल) येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आश्रमीय संत तथा कृषीभूषण ब्रह्मचारी लक्ष्मणगिरीजी महाराज होते.

ध्वजपूजेचा सन्मान भागीनाथ चव्हाण, श्रीफळ फोडण्याचा सन्मान बाबासाहेब जाधव, तर मुख्य ध्वजारोहणाचा सन्मान भारतीय सैन्यदलातील अर्जुन वाघ यांना मिळाला. मान्यवरांच्या हस्ते बाबाजींच्या प्रतिमेचे व भारतमातेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आश्रमीय संत ब्रह्मचारी रामानंदजी महाराज यांचीही उपस्थिती होती.

स्वातंत्र्यदिनानिमित्त ढोल-ताशांच्या गजरात व स्वातंत्र्यदिनाच्या जयघोषात वेरूळ लेणी परिसरातून प्रभातफेरी काढण्यात आली. त्यानंतर ध्वजारोहण, राष्ट्रगीत व राज्यगीत झाले. विद्यालयाचे प्राचार्य डी. एस. ढोबळे यांनी प्रास्ताविक केले.

विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, संस्कृत व इंग्रजी भाषेत स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्याची माहिती सांगितली. विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक गुळवे गुरुजी यांनी स्वातंत्र्यदिनाचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडला. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत देशहितासाठी सुरू असलेल्या विविध कार्यांचा गौरव केला. संस्थेचे समन्वयक बाजीराव काळोखे गुरुजी व ब्रह्मचारी रामानंद महाराज यांनीही मार्गदर्शन केले.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भागीनाथ चव्हाण यांच्याकडून विद्यार्थ्यांना केळी, तर मच्छिंद्र अधाने यांच्यातर्फे सफरचंदांचे वाटप करण्यात आले. २००५ च्या दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी गुलाबजामची पंगत आयोजित केली. तसेच दरवर्षी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी विद्यार्थ्यांना पंगत देण्याचा संकल्प करण्यात आला.

कार्यक्रमास प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ताले ताई, मुळे गुरुजी, तसेच प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक तथा पर्यवेक्षक अधाने गुरुजी यांनी केले, तर देव गुरुजी यांनी आभार मानले.

BHARAT 24 TAAS

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)
व्हॉट्सॲप शेअर