मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
⛽ पेट्रोल मुंबई: ₹104.21/L | पुणे: ₹103.85/L
🪙 सोने (24K) ₹72,450 / 10gm
🥈 चांदी ₹84,200 / 1kg
📅 पंचांग आजची तिथी: श्रावण शु. पक्ष
ब्रेकिंग

सामाजिक कार्यकर्ता पांडूरंग जाधव यांच्या शब्दांत खुलताबाद पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेचे कौतुक

अक्षर आकार:


खुलताबाद, 27 ऑगस्ट 2026 - दिल्लीहून वेरूळ येथे श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी आलेल्या महिलेची बसमध्ये पर्स विसरली होती. पर्समध्ये १५ हजार रुपये रोख आणि सुमारे दीड लाख रुपये किमतीचे दागिने होते. महिलेने खुलताबाद पोलिसांची मदत घेतल्यानंतर पोलीस निरीक्षक महाजन, उपनिरीक्षक पाटील आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्परतेने कार्यवाही करत पर्स शोधून महिलेला परत मिळवून दिली.

खुलताबाद पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे माणुसकीचे दर्शन घडले असून, जनतेच्या अडचणीच्या काळात पोलीस प्रशासन कसे मदतीला धावून येते, याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग देविदास जाधव यांनी सांगितले. त्यांनी पोलीस निरीक्षक महाजन, उपनिरीक्षक पाटील यांच्यासह संपूर्ण खुलताबाद पोलीस प्रशासनाचे आभार मानत त्यांच्या कर्तव्यदक्ष कामगिरीचे कौतुक केले.

BHARAT 24 TAAS

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)