Hot Posts

6/recent/ticker-posts

जोगेश्वरीच्या बालविकास विद्यामंदिरात ‘रूम टू रीड’चे सुसज्ज बाल वाचनालय सुरू; विद्यार्थ्यांमध्ये वाचनाचा नवा उत्साह!


विशेष वृत्तांकन: संदिप कसालकर

मुंबई : बालवयातच पुस्तकांशी घट्ट मैत्री व्हावी आणि वाचनाची गोडी वाढावी, या उद्देशाने रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज मुंबई संचलित ‘बालविकास विद्यामंदिर’ (प्राथमिक विभाग) येथे ‘रूम टू रीड’ संस्थेच्या सहकार्याने अत्याधुनिक व समृद्ध बाल वाचनालय सुरू करण्यात आले आहे.


स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मुंबई पश्चिम उपनगरे (खाजगी प्रा. शाळा) अधीक्षक निशा यादव आणि संस्थेचे कार्याध्यक्ष सहदेव सावंत यांच्या हस्ते या वाचनालयाचे दिमाखदार उद्घाटन पार पडले.

या प्रसंगी ‘रूम टू रीड’चे पदाधिकारी निकी प्रेमानंद, लायब्ररी कोच ललिता राऊत, संस्थेचे उपखजिनदार विजय खामकर, प्रशासकीय समिती अध्यक्ष सुबोध बने, आरजेएमडीएस इंग्लिश स्कूलचे सीईओ दीपक खानविलकर, प्रशासकीय समिती अधिकारी यशवंत साटम, उमाकांत कदम, विजय जाधव, इंद्रायणी सावंत, सुशील चव्हाण, जयंत गुजर, मुख्याध्यापिका डिंपल दुसाने, मुख्याध्यापिका शबनम हूल्लूर, बालविकासचे मुख्याध्यापक जगदीश सूर्यवंशी, मुख्याध्यापिका स्नेहल देसाई यांच्यासह शिक्षक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • ज्ञानवर्धक संग्रह: विद्यार्थ्यांचा वयोगट व बौद्धिक स्तर लक्षात घेऊन विविध विषयांवरील पुस्तकांचा खजिना उपलब्ध.

  • कौशल्यांचा विकास: वाचनातून मुलांची कल्पनाशक्ती, भाषाज्ञान व आत्मविश्वास वाढवणे हा मुख्य हेतू असल्याचे ललिता राऊत यांनी नमूद केले.

उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांनी विविध पुस्तके हातात घेत उत्स्फूर्तपणे वाचनाचा मनमुराद आनंद लुटला. हे सुसज्ज वाचनालय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व बौद्धिक विकासात महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments