भारत २४ तास • संपूर्ण माहिती. संपूर्ण सत्य.
मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
भारत २४ तास सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुपवर ताज्या बातम्यांसाठी जॉईन व्हा!

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फाउंडेशनची नूतन कार्यकारिणी जाहीर

अक्षर आकार:
महाराष्ट्र व देशातील ताज्या घडामोडींसाठी ग्रुप जॉईन करा!
जॉईन व्हा
मोबाईल शेप डिजिटल बातमी कार्ड (4:5 Format) व्हॉट्सॲप स्टेटस व सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी १-क्लिकमध्ये डाऊनलोड करा!

खुलताबाद, 19 स्पटेंबर 2026 - खुलताबाद येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फाउंडेशन सामाजिक उत्कर्ष कृती समितीच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष राजू भाऊ भालेराव, मराठवाडा अध्यक्ष सुधाकर चांदणे, जिल्हाध्यक्ष विलास सौदागर आणि जिल्हा उपाध्यक्ष विकी चांदणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. समाजातील विविध घटकांना संघटित करून सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करण्यासोबतच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा व साहित्याचा समाजात व्यापक प्रसार करण्याबरोबरच सामाजिक प्रश्नांवर संघटितपणे भूमिका मांडण्याचा संकल्पही करण्यात आला.


• नूतन कार्यकारिणी

अध्यक्षपदी सुखदेव तुपे, उपाध्यक्षपदी मोहन भाऊ तुपे व दिलीप भाऊ बावस्कर, कार्याध्यक्षपदी काशिनाथ तुपे, कार्यउपाध्यक्षपदी अशोक तुपे, सचिवपदी प्रविणकुमार शेजवळ, उपसचिवपदी मच्छिंद्र घोरपडे, तर कोषाध्यक्षपदी सोमनाथ काळे यांची नियुक्ती करण्यात आली.तसेच कोषाध्यक्ष उपाध्यक्षपदी संतोष अर्जुन तुपे, संघटकपदी विलास भालेराव, सहसंघटकपदी शशिकांत भालेराव यांची नियुक्ती झाली. सल्लागार म्हणून शंकरराव अंभोरे, एकनाथ लोंढे, देवराव ठोकळ, रमेश तुपे, ईश्वर काळे व विशाल वाघुले यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून राजू भालेराव, संतोष काळे, अमोल तुपे, आकाश भालेराव, वैभव तुपे, विजय भालेराव, अशोक काळे, अंकुश नाडे व शरद तुपे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

नूतन पदाधिकाऱ्यांना यावेळी नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे पुस्तक व पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा व सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेत समाजातील विविध प्रश्नांवर सकारात्मक आणि संघटितपणे कार्य करण्याचा संकल्प उपस्थितांनी केला. उपस्थित मान्यवर व समाज बांधवांच्या सहभागामुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

BHARAT 24 TAAS

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)
व्हॉट्सॲप शेअर