भारत २४ तास • संपूर्ण माहिती. संपूर्ण सत्य.
मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
भारत २४ तास सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुपवर ताज्या बातम्यांसाठी जॉईन व्हा!

कोण आहे तो 'नानू'? अंधेरीतील ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, पोलिसांच्या कारवाईने खळबळ!

अक्षर आकार:
महाराष्ट्र व देशातील ताज्या घडामोडींसाठी ग्रुप जॉईन करा!
जॉईन व्हा
मोबाईल शेप डिजिटल बातमी कार्ड (4:5 Format) व्हॉट्सॲप स्टेटस व सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी १-क्लिकमध्ये डाऊनलोड करा!

वृत्तांकन: संदिप कसालकर

मुंबई (अंधेरी): मुंबई पोलिसांनी ड्रग्स माफियांविरोधात आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे. अंधेरी पश्चिम परिसरात पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास एका चाळीत धाड टाकून तब्बल ५ लाख ९५ हजार रुपये किमतीचे एमडी (Mephedrone) ड्रग्स जप्त केले आहे. या कारवाईत दोन ड्रग्स तस्करांना रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांचा तिसरा साथीदार सध्या फरार आहे.

मध्यरात्री १.३० वाजता 'ऑपरेशन अंधेरी'

मिळालेल्या माहितीनुसार, दौलत नगर पोलिसांना अंधेरी पश्चिम येथील उस्मानिया डेअरी जवळील एका चाळीत ड्रग्सचा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. पोलीस निरीक्षक अविनाश डेराडे आणि सचिन खोंद्रे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वेळ न घालवता मध्यरात्री १:३० च्या सुमारास त्या खोलीवर छापा टाकला. 

पोलिसांची एन्ट्री होताच आरोपींची पळापळ झाली, मात्र सतर्क पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या.

काय काय सापडले?

झडती दरम्यान पोलिसांना ११९ ग्रॅम एमडी ड्रग्स सापडले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याची किंमत सुमारे ६ लाख रुपयांच्या घरात आहे.

अटक केलेले आरोपी: ५२ वर्षीय रहमतुल्ला जाफर खान आणि ३१ वर्षीय अर्शद रज्जाक खान.

फरार आरोपी: अर्बाज मुझम्मिल खान उर्फ 'नानू'. हा आरोपी ड्रग्स पुरवठादार असल्याची माहिती समोर आली असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

ड्रग्सविरोधात 'झिरो टॉलरन्स'

अटकेतील आरोपींविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायदा (NDPS Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे ड्रग्स कोठून आले आणि मुंबईत कोणाकोणाला पुरवले जाणार होते, याचा तपास आता पोलीस करत आहेत. 

मुंबईत गेल्या काही दिवसांत पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोठी मोहीम उघडली असून, या कारवाईमुळे अंधेरीतील ड्रग्स पेडलर्समध्ये मोठी खळबळ माजली आहे.

Bharat 24 Taas

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)
व्हॉट्सॲप शेअर