भारत २४ तास • संपूर्ण माहिती. संपूर्ण सत्य.
मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६
भारत २४ तास सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुपवर ताज्या बातम्यांसाठी जॉईन व्हा!

‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय बंदर’ लवकरच? केंद्रीय मंत्र्यांसमोर खासदार रविंद्र वायकर यांची जोरदार मागणी!

अक्षर आकार:
महाराष्ट्र व देशातील ताज्या घडामोडींसाठी ग्रुप जॉईन करा!
जॉईन व्हा
मोबाईल शेप डिजिटल बातमी कार्ड (4:5 Format) व्हॉट्सॲप स्टेटस व सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी १-क्लिकमध्ये डाऊनलोड करा!

वृत्तांकन: संदिप कसालकर

दिल्लीमध्ये केंद्रीय बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची सदिच्छा भेट घेऊन मुंबई-कोकण किनारपट्टीवरील जेट्टींच्या आधुनिकीकरणासाठी तसेच पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराला ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय बंदर’ हे नाव देण्याची ठोस मागणी खासदार रविंद्र वायकर यांनी केली आहे.

ही मागणी केवळ नावापुरती नसून, कोकणातील समुद्रमार्गाचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर निर्माण करून स्थानिक रोजगार व पर्यटन वाढवण्यासाठी एक मोठा टप्पा ठरू शकतो.

या बैठकीत वर्सोवा जेट्टीच्या प्रलंबित सौंदर्यीकरण व आधुनिकीकरण, कोळी समाजाच्या गरजा, तसेच मच्छीमार बांधवांसाठी आवश्यक सुविधा या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. यावर केंद्रीय मंत्री सोनोवाल यांनी लवकरच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

ही हालचाल म्हणजे मुंबई आणि कोकणच्या किनारपट्टीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देऊन या प्रकल्पास ऐतिहासिक सन्मान मिळणार असून, स्थानिक अर्थव्यवस्थेस चालना देणारी ही योजना ठरणार आहे.

Bharat 24 Taas

Comments

सिटीझन रिपोर्टर व्हॉट्सॲप ग्रुप (Join Group)
व्हॉट्सॲप शेअर